महाराजस्व अभियानांतर्गत नावंढे येथे दाखले शिबिराचे आयोजन

 


अलिबाग,दि.08 (जिमाका):- महाराजस्व अभियानांतर्गत खालापूर तहसिल कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक व अन्य कामाकरिता लागणाऱ्या दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांच्या विशेष प्रयत्नातून खालापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये या विशेष दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नावंढे गावात राबविण्यात आलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता खालापूर तहसिल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत