जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मी. पावसाची झाली नोंद
अलिबाग, दि.23 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.19 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून 2022 पासून आज अखेर एकूण सरासरी 1 हजार 726.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-7.00 मि.मी., पेण-15.00 मि.मी., मुरुड-7.00 मि.मी., पनवेल-2.40 मि.मी., उरण-3.00 मि.मी., कर्जत-28.20 मि.मी., खालापूर-9.00 मि.मी., माणगाव-8.00 मि.मी., रोहा-11.00 मि.मी., सुधागड-7.00 मि.मी., तळा-12.00 मि.मी., महाड-26.00 मि.मी., पोलादपूर-19.00 मि.मी, म्हसळा-7.00 मि.मी., श्रीवर्धन-11.00 मि.मी., माथेरान-6.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 179.00 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 11.19 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 55.67 टक्के इतकी आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षी दि.23 जुलै 2021 रोजी सरासरी 100.13 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती...