शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय -पालकमंत्री ना.प्रकाश महेता
अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम भरून कर्जमुक्ती देण्याचा हा राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे, असे उद्गार राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता यांनी आज येथे काढले. रायगड जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकरी कुटुंब सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका आदि मान्यवर उपस्थित होते. ...