Posts

Showing posts from February 9, 2025

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

    रायगड,दि.11(जिमाका):-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित्त आहे. यामध्ये निर्लेखित झालेले यंत्रसामुग्री व उपकरणे इत्यादी साहित्याचा समावेश असून या निविदा प्रक्रियेकरीता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात, असे आवाहन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एन.एस.पुरकर यांनी केले आहे. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधीत विभागामध्ये दि. 12 फेब्रुवारी 2025 ते दि.20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यन्त पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/-(अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल. सदर नमुन्यातील पूर्ण माहीती अचुक पणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र)  अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल सदर रक्...

रायगड जिल्ह्यात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास वर्षभरात 15 दिवसांची विशेष परवानगी

  रायगड (जिमाका) दि. 11:- केंद्र शासनाच्या दि.10 ऑगस्ट 2017 रोजीच्या अधिसूचनेव्दारे ध्वनीप्रदूषण (नियम व नियंत्रण) सुधारीत नियमनुसार ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 अंतर्गत वर्ष 2025 साठी 15 दिवसांकरिता सकाळी 6.00 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी  आदेश जारी केला  आहे.                                              ...

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Image
    रायगड (जिमाका) दि. 11- जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग शहरातील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापन करण्यात आली आहे.  राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची देखील प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.जिल्ह्यात परीक्षा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे. इंग्लिश विषयाची परीक्षा सुरू असताना  जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय येथील केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.  परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे न...