Posts

Showing posts from June 7, 2026

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी अमृत मानस मित्र चे मोफत प्रशिक्षण

    रायगड-अलिबाग, दि.9 जून (जिमाका) : आजच्या वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम, तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आणि त्यामुळे अनेक गंभीर घटना आणि समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गरज आणि समस्या लक्षात घेऊन अमृत या संस्थेने ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.             महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) मार्फत "अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक भागीदार (Technical Partner) म्हणून कार्यरत राहणार आहे. MIMH ही मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रश...

महत्त्वपूर्ण “एकल महिला धोरण” उपक्रमात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे

          रायगड-अलिबाग, दि.9जून (जिमाका) : महाराष्ट्र शासन राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र "एकल महिला धोरण" तयार करीत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक व्हावे यासाठी राज्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विषयतज्ज्ञ यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे  यांनी केले आहे.               एकल महिलांच्या समस्या केवळ मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणत्या नवीन योजना सुरू कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल करावेत तसेच आवश्यक असल्यास कोणत्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये सुधारणा करण्यात य...

पनवेल येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

  रायगड-अलिबाग, दि.9जून (जिमाका) : शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलींचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, ग्रीन पार्क सोसायटी समोर सेक्टर 10, प्लॉट नंबर 21 कळंबोली, पनवेल येथे कार्यरत आहे.    या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छूक विद्यार्थींनींनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल श्रीमती उषा शशिकांत गुजेला यांनी केले आहे. या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती 85 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के,  आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थीनी 5 टक्के व विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दुध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.स...

अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

  रायगड-अलिबाग,दि.9 जून (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, गणेश मंदिर शेजारी, विजयनगर, वरसोली अलिबाग येथे कार्यरत आहे. या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग जी.व्ही.विहाडे यांनी केले आहे.              या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती 85 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के,  आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के व विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थ्यांकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दुध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण...

अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    रायगड-अलिबाग,दि.9 जून (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, यामाहा शोरुम, आर.सी.एफ.गेटसमोर, वेश्वी अलिबाग येथे कार्यरत आहे. या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छूक विद्यार्थींनींनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग श्रीमती उषा शशिकांत गुजेला यांनी केले आहे.              या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती 85 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के,  आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थीनी 5 टक्के व विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफर...

नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षणाकरिता नागरिकांनी सहकार्य करावे

    रायगड-अलिबाग, दि.9 जून (जिमाका) : शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय , नियोजन विभाग यांच्याद्वारे प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण ( PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण ( ASUSE) एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येत आहे. याकरिता रायगड जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या घटकांच्या सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना सर्व संबंधित कुटुंबीयांनी सहकार्य करावे असे  आवाहन    उपआयुक्त , जिल्हा सांख्यिकी कार्यालय रायगड यांनी केले आहे . या सर्वेक्षणाच्या क्षेत्रीय कामासाठी नियुक्त केलेल्या अन्वेषक व पर्यवेक्षक यांची पुणे व कोकण विभागाची विभागीय प्रशिक्षण कार्यशाळा दि. 05 जून ते 10 जून 2026 या कालावधीत आयोजित केली असून या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा दि. 05 जून 2026 रोजी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था ( NIPHT), तळेगाव दाभाडे , पुणे येथे आयुक्त , अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय , मुंबई डॉ.ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते संपन्न झाला. या उद्घाटन समारंभास सहसंचालक , NSO-FOD, पुणे डॉ.रुही कुलकर्णी ,   सहआयुक्त , प्रा...