Posts

Showing posts from October 4, 2026

टीबीमुक्त जिल्ह्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत -- जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड-अलिबाग,दि.6(जिमाका): राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष किशन  जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी केले. या बैठकीस जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनिषा चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयेश गोसावी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, WHO Consultant ठाणे सर्कल डॉ. ज्योती साळवे, MO ART Centre डॉ. संदीप रेस्वाल, डापकूचे संजय माने, PLHV प्रतिनिधी संघटना पनवेलच्या प्रिया नारखेडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक स्तर अलिबाग रेश्मी साळुंखे, वैद्यकीय अधिकारी DTC अलिबाग डॉ. सुरेश ठोकळ व डॉ. अक्षयराज राठोड, तसेच दंतराव सतीश, सुभाष भोजने आणि धनंजय पाटील यांच्यासह  सर्व तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग...

महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढा--जिल्हाधिकारी किशन जावळे महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
   रायगड-अलिबाग,दि.6(जिमाका): वर्षा नुवर्षे महसूल विभागाकडे प्रलंबित असलेली छोटी-मोठी प्रकरणामध्ये किरकोळ कारणांमुळे वाद वाढवत नेल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च होते. पक्षकारांनी महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून परस्पर सामोपचाराने, संवादातून आणि सलोख्याच्या भूमिकेतून ही प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.      जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.      यावेळी अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अनंत पाटील (प्रभारी), ॲड. मच्छिंद म्हात्रे आणि मोठ्या संख्येने पक्षकार  उपस्थित होते.      जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, अनेक वेळा जमिनीचा वाद, मालमत्तेशी संबंधित छोटासा प्रश्न किंवा इतर किरकोळ कारणांमुळे पक्षकारांमध्ये वाद निर्माण होतो. पूर्वजांची समान मालमत्ता किंवा एकच कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये निर...

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका): राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि.08 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं.6.10 वा. रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथून करमाली एल.टी.टी.एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण. रात्रौ 10.25 वा. पनवेल रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह अलिबागडे प्रयाण. रात्रौ 11.55 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव व मुक्काम. शुक्रवार, दि.09 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा परिषद सभागृह, अलिबाग येथे सकाळी 9.45 वा. ते दुपारी 12.15 वा. “ चला शाळेत जाऊ या अभियान ” अंमलबजावणी आढावा बैठक उपस्थिती. दुपारी 12.30 वा. ते 2.00 वा. शाळा भेटीचा कार्यक्रम.  दुपारी 2.00 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने पनवेलकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. पनवेल येथे माजी खासदार रामशेठजी ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : 56, पुरोहित हॉस्पिटल जवळ, एम.पी.सी.एच.सोसायटी, पनवेल. दुपारी 4.00 वा. पनव...