माथेरान येथील शासकीय भूखंडांबाबत जिल्हा प्रशासनाकडून न्यून मुद्रांक शुल्क वसुलीची कार्यवाही सुरू
अलिबाग,जि.रायगड,दि.01, (जिमाका) :- मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड यांनी मौजे माथेरान येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पारित हस्तांरतण व नूतनीकरणांच्या आदेशांच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीनुसार, साधारणतः सन 2010 पासून तपासणी केलेल्या प्रकरणांमध्ये करारनामा दस्त निष्पादित न होता, नोंदणी शुल्क/ मुद्रांक शुल्क शासन जमा करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पडताळणी समिती गठित करुन, तपासणी करणे व मुद्रांक शुल्क वसूल करण्याबाबत कार्यवाही करण्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पडताळणी केल्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने संबंधित भाडेपट्टाधारक यांनी अद्यापही करारनामा/ दस्त निष्पादित न केल्याने, या कार्यालयामार्फ...