जागतिक गुंतवणूकदारासांठी महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक गुंतवणूकदारासांठी महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिबाग दि.28 (जिमाका), जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य असून देशात झालेल्या गुंतवणूकीपैकी अर्धी गुंतवणूक राज्यात झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाताळगंगा येथे केले. रसायनी पाताळगंगा येथे जपानच्या कोकुयो व भारताच्या कॅम्लीन यांच्या संयुक्त नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जपानचे राजदूत केंग हिरामटसु, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, कॅम्लीनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर, उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, मुख्य कार्यकारी अधि...