अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 2022-23 चा लाभ घ्यावा
अलिबाग, दि.11 (जिमाका):- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इ. 01 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णय क्र. पपका-2007/270/07 असक, दि.23 जुलै 2008 अन्वये राज्यातील अल्पसंख्यक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु झाली आहे. यावर्षी NSP 2.0 पोर्टलवर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि.20 जुलै 2022 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख- दि.30 सप्टेंबर 2022 तर शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख- दि.26 ऑक्टोबर 2022 ही आहे. अटी व शर्ती:- इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व माध्यमाच्य...