पेण येथे राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग सेमिनार संपन्न


अलिबाग, दि.09 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन यांच्यामार्फत राज्यस्तरिय एल्बोबॉक्सिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

या सेमिनारमध्ये धुळे, जळगाव, नाशिक,पुणे, नंदुरबार व रायगड येथून जवळजवळ 42 जणांनी सहभाग घेतला. या सेमिनार द्वारे हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा चा संदेश देण्यात आला.

या सेमिनारचे उद्घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंदार पनवेलकर यांनी केले. या सेमिनार मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग चे अध्यक्ष श्री.सुरेश कोळी, श्री.सागर कोळी, श्री.संदीप माने यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक तसेच पेण तालुका क्रीडा अधिकारी सौ.अंकिता मयेकर यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.

हे संपूर्ण सेमिनार रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष श्री.रविंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज