नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे - प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे
अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका) अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावीत अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी महा चक्रीवादळ पूर्वतयारी व उपयोजना प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी सर्व विभाग प्रमुखांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या. सर्व विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. दुरध्वनी क्रमांक सुरु आहेत याची खात्री करावी, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ प्रतिसाद द्यावा. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर तात्काळ परत बोलविण्यात यावे. पुढील सूचना मिळेपर्यंत मासेमारीसाठी परवाना देण्यात येवू नये. तसेच मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात यावी. मासेमारी जेट्टींवर सूचना फलक लावण्य...