कोविडचे प्रमाण वाढत आहे-घाबरू नका...पण काळजी घ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जनतेस केले आवाहन
अलिबाग,दि.05(जिमाका) :- सध्या राज्यामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यानुषंगाने दि. 29 मार्च 2023 रोजी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोविडच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा स्तरावर रुग्णालयाची तयारी, मॉकड्रीलबाबतच्या सूचना आणि औषधसाठा व इतर साधन सामग्रीबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतील सविस्तर चर्चेनंतर सर्व जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जनतेलाही विविध मुद्दयांबाबत आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणांनी रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटीदरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी ILI /SARI सारख्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करणे,ILI म्हणजे सौम्य ताप , सर्दी, खोकला, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, SARI म्हणजे तीव्र ताप, श्वसनास त्रास होणे, धाप लागणे, तीव्र स्वरूपाचा खोखला लागणे इ., क...