जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या विविध कामकाजांसाठी कल्याण संघटक श्री.शेख यांच्या नियोजित दौऱ्याचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.05 (जिमाका) :-जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड कार्यालयाच्या अखत्यारितील सैनिकी मुलांचे वसतिगृह, महाड येथे श्री.शेख युनूस शेख गुलजार हे महाड येथे वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते माजी सैनिक कल्याण संघटक म्हणूनही जबाबदारी सांभाळतात. माहे मार्च 2023 पासून जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी, अवलंबित यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणे, आर्थिक मदतीची प्रकरणे, पेन्शन विषयक कामे, नामनिर्देशन, माजी सैनिक ओळखपत्रे, दुसरे महायुद्ध हयातीचे दाखले इत्यादी कामाकरिता महिन्याचा दुसरा व चौथा मंगळवार, सैनिक विश्रामगृह, पोलादपूर, महिन्याचा दुसरा व चौथा बुधवार सैनिक विश्रामगृह, माणगाव येथे माजी सैनिक कल्याण संघटक श्री.शेख यांचा नियोजित दौरा निश्चित करण्यात आला आहे.

 तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी, विधवा पत्नी यांनी दौऱ्याच्या ठिकाणी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत उपस्थित राहून आपल्या प्रलंबित काम पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ले.कर्नल (निवृत्त) श्री.राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत