शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

रायगड (जिमाका) दि.4 :- ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या शुक्रवार दि.5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देवून तयारीची पाहणी केली. यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री श्री.सामंत यांनी व्यासपीठ, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग, बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिर स्थळ, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आद...