आदिवासी मुलांचे/मुलींचे 13 वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शासकीय वसतिगृह प्रवेश सुरु
रायगड, दि. 3 (जिमाका) ;- आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता इ.8वी पासुन पुढील शिक्षणाकरिता रायगड मध्ये पेण (मुले), कर्जत (मुले), नेरळ (मुले), पनवेल खांदा कॅालनी (मुले), पनवेल नविन (मुले), महाड (मुले), सुधागड (मुले), नागोठणे (मुले), पेण (मुली), पनवेल (मुली), नेरळ (मुली), सुधागड (मुली) व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी (मुले) असे एकुण 13 वसतिगृहे कार्यान्वयित आहे. वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता प्रवेश अर्ज https://swayam.mahaonline.gov. in या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. अर्ज भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर आवश्यक सुचना या सदर वेबसाईटवर दिलेल्या आहेत. “ सदर वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व निर्वाह भत्ता सोय व इतर शैक्षणिक सोयी सुविधा आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. ” वसतिगृह प्रवेशासंदर्भात कोणत्याही अडचणीकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड येथील वसतिगृह विभागाशी संपर्...