उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, दि.29 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे सोमवार, दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: सकाळी 8:10 वाजता “ मुक्तागिरी ” बंगला, मलबार हिल, मुंबई येथून मोटारीने गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. सकाळी 8:30 वाजता गेट वे ऑफ इंडिया (गेट नं. 4) येथून स्पीड बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9 वाजता बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड येथे आगमन व मोटारीने आक्षी, ता.अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता मराठी भाषा आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण करणे या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: ग्रामपंचायत आक्षी, ता.अलिबाग). सकाळी 9:50 वाजता आक्षी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यातील साबरकुंड धरण प्रकल्प भूसंपादन संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 10:30 वाजता आंबेत पूल संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग). सकाळी 11 वाजता राष्ट्रीय एकता द...