Posts

Showing posts from August 22, 2021

जिल्ह्यात दि.25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि.25 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्री.संदीप वि. स्वामी यांनी दिली आहे.   या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट, खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे दि.25 सप्टेंबर 2021 रोजी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदाल...

निर्मल गणेशोत्सव” स्पर्धेत नागरिक, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

  “   अलिबाग,जि.रायगड,दि.26(जिमाका) : गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृतीची व प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने कोविड काळात नियम पाळून सामाजिक भावनेने रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत “ निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे ” आयोजन दि.9 सप्टेंबर 2021 ते 21 सप्टेंबर 2021   या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे,सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरांवरील नागरिकांनी मोठया प्रमाणवर सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.                या स्पर्धेचा उद्देश हा पर्यावरण रक्षण ,निसर्ग संवर्धन , परिसर स्वच्छता व आरोग्याप्रती चांगल्या सवयी लावून गावपातळीवर जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन निर्मल वातावरणात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणे, हा आहे.या स्पर्धेमध्ये   स्पर्धकांनी   सहभाग घेण्याकरिता http://bit.ly/raigadganesh या गुगल लिंकवर   दि.21 सप्टेंबर 2021    पर्यंत नोंदणी ...

केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदेचा “वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन” पुरस्कार नवीन पनवेलच्या श्री.डी.डी.विसपुते कॉलेज महाविद्यालयाला घोषित

  अलिबाग,जि.रायगड,दि.26(जिमाका) : - उच्च शिक्षण मंत्रालयाच्या ग्रामीण शिक्षण विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदेने “ वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन ” हा पुरस्कार नुकताच श्री.डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या महाविद्यालयाला घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार दि.24 ऑगस्ट 2021 रोजी रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते श्री.डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या कॉलेजच्या वतीने सचिव श्रीमती संगीता विसपुते व   प्राचार्या विद्या मोहोळ यांनी स्विकारला. उच्च शिक्षण विभाग, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या हरित भारत उपक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील या महाविद्यालयाने एक मानक स्वच्छता कृती योजनाबध्द रितीने राबवून विद्यार्थी आणि परिसर स्तरावर स्वच्छ आणि हरित परिसर साकारण्यासाठी अथक परिश्रम घेतले.   हरित परिसर, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धन या विषयांवर एकत्रित काम करण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांनी सांघिक अथक प्रयत्न ...

जिल्ह्यात दि. 15 एप्रिल ते 23 ऑगस्ट या कालावधीत 14 लाख 97 हजार 341 शिवभोजन थाळींचे मोफत वितरण

            अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका) : - कोविड-19 दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर आर्थिक मदतीच्या अनुषंगाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.   या योजनेंतर्गत दि. 15 एप्रिल 2021 पासून दि.23 ऑगस्ट 2021 पर्यंत रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात कार्यरत   असलेल्या एकूण 91 शिवभोजन केंद्रामार्फत मोफत वितरीत करण्यात आलेल्या शिवभोजन थाळींची संख्या 14 लाख 97 हजार   341 असून   दि.23 ऑगस्ट 2021 रोजी मोफत वितरीत करण्यात आलेल्या शिवभोजन थाळींची संख्या 11 हजार 485 आहे, तसेच जुलै महिन्यात महाड आणि पोलादपूर तालुक्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्तांसाठी शिवभोजन थाळींचे वाटप करण्यात आले होते.   हे वाटप दि. 14 सप्टेंबर 2021 पर्यंत नि:शुल्क सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी   माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके दिली आहे. ००००००

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शुक्रवार दि.27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वा.सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून शासकीय वाहनाने वडखळ, ता.पेणकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. वडखळ, ता.पेण येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर कामांचा उद्घाटन सोहळा. दुपारी 12.50 वा. वडखळ, ता.पेण येथून डोलवी, ता.पेण कडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. डोलवी येथे आगमन व आरोगय शिबीर, फिल्टर प्लँटचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 ते 2.00 वा. राखीव. दुपारी 2.00 वा. वडखळ, ता.पेण येथून शासकीय वाहनाने पुणे कडे प्रयाण. ०००००० ०

पोलादपूर मधील साखर सुतारवाडी व केवनाळे व महाड मधील तळीये भागाची जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली पाहणी आतापर्यंत केलेल्या व यापुढे करावयाच्या उपाययोजनांची घेतली माहिती

    अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका):- पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे तसेच महाड मधील तळीये या   दरडग्रस्त भागाची     जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज पाहणी केली. याशिवाय त्यांनी महाड शहराचीही पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या व यापुढे करावयाच्या   उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व येथील नागरिकांना शासकीय सोयी-सुविधा देण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, पोलादपूर प्र.तहसिलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी श्रीमती वृषाली यादव,तालुका आरोग्य अधिकारी गुलाबराव सोनवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 000000

महाड नगरपरिषद आणि जिल्हा अग्रणी बँक,बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे 26 ऑगस्ट रोजी कर्ज मेळाव्याचे आयोजन

          अलिबाग,जि.रायगड,दि.25 (जिमाका) :- महाड नगरपरिषद आणि जिल्हा अग्रणी   बँक ,बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे दि.26 ऑगस्ट 2021 रोजी कर्ज मेळाव्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, चवदार तळे ,महाड येथे सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. महाड शहरातील सर्व बँका यामध्ये सहभागी होणार आहेत. या कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेंतर्गत   शिशु कर्ज   (पन्नास हजार   पर्यंत) , हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत (दहा हजार पर्यंत) आणि शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज या   योजनेकरिता अर्ज स्वीकारले जाणार आहेत.             याकरिता आपले खाते ज्या बँक शाखेमध्ये आहे तेथे 1) अर्ज, 2) आधार कार्ड किंवा पॅन कार्ड रेशन कार्ड, 3) फोटो इत्यादी कागदपत्रे घेऊन आल्यानंतर आपल्याला संबंधित कर्जाबद्दल अर्ज व मार्गदर्शन मिळेल. तरी या सूवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले व्यवसाय पूर्ववत सुरू क...

ठाणे, चंद्रपूर, अकोला येथे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ओळखले जाणारे डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हाधिकारीपदी रुजू

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका): रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज सूत्रे स्वीकारली.                  यापूर्वी ते कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते. भारतीय प्रशासन सेवेतील 2007   बॅचचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी असताना दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता.               ठाणे येथे जिल्हाधिकारी असताना अल्पावधीतच डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला दिलेली शासकीय सेवा, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज, पिक कर्जवाटपात केलेली लक्षणीय वाढ, जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून केलेली कामे, शासकीय जत्रेसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून एकाच ठिकाणी केलेले काही लाख दाखल्यांचे वाटप, जिल्हा प्रशासनाचे   पहिले कौशल्य विकास केंद्र, सर्वाधिक पेसा गावांसाठी केलेले प्रयत्न या कामांची दखल घे...

भूजल साक्षरता अभियानांतर्गत जलजागृती फिरत्या चित्ररथाचे हिरवा झेंडा दाखवून अनावरण

  वृत्त क्रमांक:- 877                                                                     दिनांक :-23 ऑगस्ट 2021   अलिबाग,जि.रायगड,दि.23 (जिमाका):- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी व अतिरिक्त संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे डॉ.प.ल.साळवे यांच्या प्रेरणेने राज्यात भूजल साक्षरता अभियानांतर्गत जलजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जलजागृती फिरत्या चित्ररथाचे आज (दि.23ऑगस्ट) रोजी रायगड जिल्हा परिषदेतील मान्यवरांच्या उपस्थितीत चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून अनावरण करण्यात आले. या चित्ररथाच्या माध्यमातून जलसाक्षरता अंतर...