कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते उद्घाटन
अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)- कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2020 रायगड क्रीडा नगरी,रिलायन्स क्रीडा संकुल नागोठणे ता.रोहा येथे दि.28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालावधीत संपन्न होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते संप्पन झाले. यावेळी खासदार सुनिल तटकरे, राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड, जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी, जिल्हाधिकारी ठाणे राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मंजू लक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन महसूल मंत्री श्री.थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुन...