Posts

Showing posts from December 11, 2016

पहिल्या टप्प्यात 67 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक:- 16/12/2016                                                                                                               वृत्त क्र. 804   पहिल्या टप्प्यात 67 गावे कॅशलेस करण्याचा निर्धार                                                                         ----जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.16 :- (जिमाका) आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार कॅशलेस  करावे. रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण 67 गावे कॅशलेस करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्धार असून यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी तसेच बँकांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना  जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यात कॅशलेस आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी.   कॅशलेस गावे करण्यासाठी निवडलेल्या गावात केलेल्या कार्यवाही संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.   या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि