जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत जनजागृती मोहिमेचे आयोजन
अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त "बालकामगार" या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. दि.12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कामगार उप आयुक्त, रायगड-पनवेल कार्यालयामार्फत सध्याची करोना परिस्थिती लक्षात घेता ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने सर्व औद्योगिक संघटना असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रिडाई- बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय / निमशासकीय संस्था, नागरिक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करुन या मोहिमेत सहभाग नोंदवावा व रायगड जिल्हा बालकामगार मुक्त करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त, रायगड- पनवेल, श्री.प्र.मा...