जिल्हा नियोजन समिती बैठक मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करा- पालकमंत्री ना. चव्हाण

अलिबाग,जि. रायगड, दि.12,(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षा करीता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत कामे पुर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले. जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील,आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकुर, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशिल पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधिक्षक अनिल पारस्क...