मराठी भाषा समिती सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11-  महाराष्ट्र विधानमंडळाची मराठी भाषा समिती सोमवार दि.15 व मंगळवार दि.16 या कालावधीत जिल्हा दौऱ्यावर येत आहे.  सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.15 रोजी स. 10 वा. अलिबाग शासकीय विश्रामगृह.  स. 11 ते दुपारी एक पर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांच्यासमवेत बैठक. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.  दु.एक ते दु.दोन वा. राखीव.   दु.दोन ते दु.साडे तीन वा. दरम्यान जिल्हा परिषद रायगड  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत बैठक.  स्थळ : जिल्हा परिषद सभागृह, रायगङ,    दु. साडे तीन ते दु.साडेचार वा. दरम्यान रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक.   स्थळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह,  रात्री शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे मुक्काम.
मंगळवार दि. 16 रोजी सकाळी साडे दहा ते दु. 12 वा. पोलिस अधिक्षक यांच्यासमवेत बैठक. स्थळ : पोलिस अधिक्षक कार्यालय.    दु. 12 वा. ते दु. दोन वा. दरम्यान नगरपरिषद, अलिबाग व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदाच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक.स्थळ : नगरपरिषद सभागृह अलिबाग.  दु. दोन वा. ते दु.तीन वा. राखीव. 
या सर्व नियोजित बैठकांमध्ये समितीमार्फत संबंधित कार्यालयांच्या कामकाजात करण्यात येणारा मराठी भाषेचा वापर, मराठी भाषेचा प्रसार व विकास करण्याकरिता जिल्हास्तरावर राबविण्यात येणारे उपक्रम तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत आढावा घेतला जाईल.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज