रायगड-अलिबाग,दि.17 (जिमाका) :- वन्य प्राण्यांचा हल्ला होवू नये, याकरिता नागरिकांना सतत जागरुक केले जात आहे. या सर्व उपाययोजना जिल्ह्यातील वन विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन, संयुक्त वनव्यवस्थापन समित्या, महसूल, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून, सहकार्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. तरी या सर्व प्रक्रियेत मानव-बिबटया संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित रायगड जिल्ह्यातील बिबटयाचा वाढता उपद्रव व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल (दृरदूश्यप्रणालीद्वारे), उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, उप वनसंरक्षक रोहा डॉ.शैलेंद्रकुमार जाधव हे उपस्थित होते. तर कांदळवन विभागाच्या विभागीय वनअधिकारी कांचन पवार या दृरदूश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्...