Posts

Showing posts from April 26, 2026

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

             रायगड-अलिबाग,दि.27(जिमाका):-   जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड - अलिबाग आणि  वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड, यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 एप्रिल 2026 रोजी वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड ता.महाड   येथे  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती   जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार   यांनी दिली आहे.           जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ ॲप्रेंटिसशिपची  भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी ,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या  संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची दि.३० एप्रिल पर्यंत संधी उपलब्ध

    रायगड-अलिबाग,दि.27(जिमाका):-   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि ही प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य निर्यामत/कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली असून याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.  ज्या महिलांची -KYC करताना चुक झाली होती त्या महिलांनी दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत -KYC करुन घ्यावी, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही, दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत -KYC नाही केली तरी सदरचा लाभ बंद होईल, असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे. 0000000

कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा’ वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न

               रायगड-अलिबाग,दि.27 (जिमाका ):-   रायगड जिल्ह्यातील वरसोली ,  अलिबाग येथे कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन ,  उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत ) च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत वर्ग’ या  किशोर विकास उपक्रमांतर्गत  आयोजित या निवासी मेळाव्याला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शारंग हॉलिडे होम ,  वरसोली येथे  13  एप्रिल  2026  रोजी सायंकाळी सुरू झालेला हा मेळावा  14  एप्रिलपर्यंत विविध उपक्रमांनी रंगला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुतार काका व अविनाश धाट काका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. या मेळाव्यात बौद्धिक खेळ ,  संस्कारमूल्ये रुजविणारे उपक्रम ,  शारीरिक क्रियाकलाप तसेच प्रेरणादायी सत्रांचा समावेश होता. सौ. गुंजाळ ताईंनी मुलींकरिता स्वसंरक्षणाच्या दृष्टीने ...

“आजच्या डिजिटल काळात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज— जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
  रायगड-अलिबाग, दि.२७ (जिमाका): आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने उत्पन्नाचे योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, गुंतवणुकीचे भान आणि कर्जाचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. Reserve Bank of India, Mumbai आणि जिल्ह्याची अग्रणी बँक Bank of India यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 एप्रिल 2026 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित Training of Trainers (ToT) कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग प्रमुख दीपनविता सहानी, उप विभागीय प्रमुख भारत सहाय, जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, तसेच रिझर्व्ह बँकेचे रायगड जिल्हा अधिकारी विशाल गोंडखे, बेंजामिन डिकोस्टा, विविध शाळांतील शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. मार्...