Posts

Showing posts from September 6, 2026

‘अमृत’तर्फे विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन विविध संस्थांनी सहभागी व्हावे

    रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका ):- स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून जगाला दिलेला सर्वधर्मसमभाव , सहिष्णुता , मानवता , परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन , उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने सन 2026 पासून दरवर्षी दि.11 सप्टेंबर ते दि.26 सप्टेंबर 2026 दरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार असून विविध संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे. आजच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत विविधता , मतभिन्नता आणि सामाजिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य , सहिष्णुता , परस्पर सन्मान आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वबंधुत्वाचा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने हा पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. ‘ शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ विशेष आकर्षण या पंधरवड्याचे प्रमुख आकर्षण ‘ शिकागो भाषण कृत...

महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी ! हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या नावाने स्मारक ओळखले जाणार; महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार : पालकमंत्री भरतशेठ गोगावले

    रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका ):- भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह स्वातंत्र्यवीर, हुतात्मे आणि सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. १० सप्टेंबर १९४२ रोजी क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली महाड तहसील कार्यालयावर निघालेल्या किसान मोर्चावर पिंपळपार परिसरात तत्कालीन इंग्रज सरकारच्या पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कमलाकर दांडेकर, अर्जुन भोई, वसंत दाते, नथु टेकावला आणि विठ्ठल बिरवाडकर या पंचवीरांना वीरमरण आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आयोजित ८४व्या हुतात्मा दिनानिमित्त पालकमंत्...

बोर्लीपंचतन पोस्ट ऑफिससाठी जागेची आवश्यकता इच्छुकांनी लेखी अर्ज सादर करावेत

                   रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका ):- भारतीय डाक विभागास बोर्लीपंचतन पोस्ट ऑफिससाठी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावामध्ये साधारण ५०० ते ६२० चौ. फूट जागेची आवश्यकता आहे. इच्छुकांनी भाड्याच्या अपेक्षित रकमेच्या उल्लेखासहित आपले लेखी अर्ज अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग या पत्त्यावर दि.२१ सप्टेंबर २०२६ दुपारी ३.३० वाजेपर्यंत पाठवावेत असे आवाहन डाक अधीक्षक रायगड मंडल अलिबाग यांनी केले आहे. जागेसंबंधीच्या प्रमुख अटी– पोस्ट ऑफिससाठी ५०० ते ६२० चौ. फूट स्क्वेअर फूट सुव्यवस्थित असलेली जागा पाहिजे. पोस्ट खाते सुचवेल त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा, दुरुस्त्या स्वखर्चाने करून घ्याव्या लागतील. त्यासाठी कोणतीही उचल (Advance) खात्याकडून मिळणार नाही.  इमारतीत स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटर, पाण्याचे नळ कनेक्शन, संडास बाथरूम व प्राथमिक सुविधा असणे आवश्यक आहे. घर मालकास ०५ वर्षे मुदतीचा करारनामा स्वखर्चाने करून घ्यावा लागेल. 00000

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी लाभ घ्यावा

  रायगड-अलिबाग,दि.9 (जिमाका): महाराष्ट्र शासनाने मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास तसेच मत्स्य व कोळंबी उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने "मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना (CMMSY)" कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत निमखारे पाणी (Brackishwater) क्षेत्रातील मत्स्य व कोळंबी संवर्धनासाठी विविध घटकांना शासकीय अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील पात्र मत्स्य व कोळंबी उत्पादक, शेतकरी, उद्योजक तसेच संबंधित लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त  मत्स्यव्यवसाय जे.एस.पटेल यांनी केले आहे. योजनेचा घटक-तपशील : सुपर-इंटेन्सिव्ह पध्दतीने कोळंबी संवर्धन करणे (राज्यस्तरीय घटक), प्रकल्प मर्यादा/किंमत रु.250.00 लाख, शासकीय अनुदान प्रमाण 30 टक्के. योजनेचा घटक-तपशील : निमखारे पाणी कोळंबी संगोपन तलाव निर्मिती (Nauplii to PL-30), प्रकल्प मर्यादा/किंमत रु.100.00 लाख प्रति 0.15 हेक्टर, शासकीय अनुदान प्रमाण अराखीव 30 टक्के, राखीव 35 टक्के. योजनेचा घटक-तपशील : निमखारे पाणी मत्स्यबीज संगोपन तलाव निर्मिती, प्रकल्प मर्यादा/किंमत रु.8.00 लाख प्रति ...

संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या जीवनदूतांचे कार्य अतुलनीय --पालकमंत्री भरतशेठ गोगावले

Image
               रायगड-अलिबाग, दि.07 (जिमाका):- अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां ’ चे कार्य अतुलीनीय आहे. त्यांच्या या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.             रायगड पोलीस आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा 2026 चे येथील आर.सी.एफ. सभागृह, कुरुळ  येथे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री. गोगावले बोलत होते.             कार्यक्रमास  जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उप नगराध्यक्षा श्रीमती मानसी म्हात्रे, रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.   ...