रविवार 22 मार्चचा जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा. घराबाहेर पडू नका, प्रशासनास सहकार्य करा - पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग दि.21, कोरोना च्या पार्श्वभूमीवर कुणीही घाबरू नये सर्वांनी धीर धरावा. कुठल्याही प्रकारचं संकट ज्यावेळेस राज्यावर आणि देशावर येतं, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीनं त्या संकटाचा सामना केला पाहिजे, ही आपली सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. या स्थितीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत आपण दुसऱ्या टप्प्यात असून त्यापुढील टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. रविवार दि 22 मार्च 2020 चा सकाळी 7 ते रात्री 9 पर्यत सर्वांनी घरीच थांबून जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा. घराबाहेर पडू नका. 31 मार्च पर्यंत घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळा. आपल्या परिवाराची काळजी घ्या, तोंडाला मास्क वापरा, खोकताना व शिंकतांना तोंडाला रुमाल लावा, हात वारंवार स्वच्छ धुवा. कोरोना विरुद्धातील लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन आपल्या सर्व शक्तीनिशी सज्ज आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, आरोग्यम...