कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वांनी सहकार्य करावे नागरीकांनी घाबरुन जावू नये-पालकमंत्री ना.आदिती तटकरे



अलिबाग दि.21, राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील विलगीकरण कक्षाची पहाणी केली त्याचबरोबर तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील सोयीसुविधा, समस्या जाणून घेतल्या. 
यानंतर श्रीवर्धन नगरपरिषद येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगर परिषद सदस्य, शासकीय अधिकारी व काही व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषाणू संसर्ग टाळण्यासाठी व उद्भवलेल्या परिस्थितीशी कसा सामना करायचा याविषयी चर्चा केली. त्याचबरोबर जनतेने घराबाहेर पडू नये, परदेशातून किंवा पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर या भागातून काही नागरिक आले असल्यास त्यांची माहिती तात्काळ प्रशासनाला कळविण्याचेही आवाहन केले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज