Posts

Showing posts from December 6, 2020

अलिबाग तालुक्यातील सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत सभा दि.16 डिसेंबर रोजी

      अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :- मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे सन 2020 -2025 च्या निवडणुकीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे.   अलिबाग तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण करिता राखून ठेवण्यात आलेली आहेत, त्या ग्रामपंचायतींपैकी सोडत पद्धतीने सरपंच पदे आरक्षित करण्यासाठी बुधवार, दि. 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.   या सभेत सोडत पद्धतीने सरपंच पदे आरक्षित करण्यात येणार आहेत.   तरी या सभेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी केले आहे. ००००००

जिल्ह्यातील ग्रामीण/शहरी भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना निःशुल्क सहशिक्षणाची जवाहर नवोदय विद्यालयात सूवर्णसंधी

                अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1988 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात आली. देशाचे माजी पंतप्रधान स्व.श्री.राजीव गांधी यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक व विविध कलागुणांचा विकासाबरोबर आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते.               नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून इयत्ता 12 वी पर्यंत वसतिगृहयुक्त पूर्णतः निःशुल्क सहशिक्षणाची सुविधा आहे. नवोदय विद्यालयाचा पाठ्यक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डद्वारे संचालित करण्यात येतो. सुसज्ज कॉम्प्युटर व विज्ञान प्रयोगशाळा, सॅमसंग स्मार्ट क्लासरूम, प्रशस्त ग्रंथालय, क्रीडांगण व जिम तसेच विद्यालयात मुला-मुलींसाठी आधुनिक व उत्तम शिक्षणाची तसेच निवासाची सुविधाही देण्यात येते.                नवोदय विद्यालयात 75टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व 25टक्केजागा शह

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणारा निवडणूक कार्यक्रम व टप्पे जाहीर जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88

  अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :- मार्च 2020 दरम्यान कोविड-19 या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्याने मार्च 2020 मध्ये होणाऱ्या सुमारे 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (एप्रिल 2020 ते जून 2020 मध्ये मुदत संपलेल्या) आयोगाच्या दि. 17 मार्च 2020 च्या आदेशान्वये स्थगित करण्यात आल्या होत्या.   या निवडणुकांचा मतदारयादी कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम आयोगाच्या दि. 19 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये रद्द करण्यात आला आहे. आता आयोगाच्या दि.20 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर दि. 17 डिसेंबर 2020 पर्यंत त्यावर हरकतीही घेण्यात आल्या आहेत. दि. 9 डिसेंबर 2020 च्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी दि. 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   या निवडणुकांच्या पूर्

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा

  अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे. शुक्रवार दि.11   डिसेंबर 2020 रोजी सोईनुसार मुंबई येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव. शनिवार दि.12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9:45 वा. सुतारवाडी ता. रोहा येथून शासकीय वाहनाने कोलाडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. कोलाड येथे आगमन व आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : आंबेवाडी नाका, द.ग.तटकरे चौक, कोलाड, सकाळी 10.30 वा. कोलाड येथून शासकीय वाहनाने रोहाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. रोहा येथे आगमन व आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता संवाद कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा, दुपारी 1.00 वा.आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : रोहा नगरपरिषदेसमेार, रोहा,

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय व महामंडळाची लाभार्थी निवड समिती बैठक संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- शा मराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग (इ.मा.व.) प्रवर्गातील होतकरू व बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय, स्वयंरोजगार करण्याकरिता अल्प व्याज दराने विविध योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. जिल्हा कार्यालय रायगडच्या कर्ज प्रस्तावातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा लाभार्थी निवड समितीची बैठक ( गुरुवार दि.10 डिसेंबर) रोजी संपन्न झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था रायगड, जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड, रायगड आदि बैठकीस उपस्थित होते या बैठकीमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या 14 प्रस्तावांना समितीने मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील होतकरू व बेरोजगार हिमावर प्रवर्गातील व्यक्तींना व्यवसाय स्वयंरोजगार याकरिता मंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बैठकीत दिल

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत खार प्रतिबंधक बंधारा सक्षमीकरणाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली- पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्याचे सक्षमीकरण करण्याचे कामासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजुरी मिळाली आहे. खारभूमी विकास मंडळ ठाणे, जलसंपदा विभागाकडून ही कामे करण्यात येणार आहेत. पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली-पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्याचे सक्षमीकरण करण्याच्या कामास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी मंत्रालय स्तरावर संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग आणि संबंधित विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार शासनाने पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली- पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या कामास अनुक्रमे रु. 44 कोटी 40 लाख 37 हजार 689 व रु. 10 कोटी 82 लाख 20 हजार 626 रक्कमेस सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने राज्य आपत्ती व्

मे.दास ऑफशोअर इंजिनिअरींग कंपनी प्रशासनाविरोधात स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश

                अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- म्हसळा तालुक्यातील मौजे तुरंबाडी येथे स्थापित मे.दास ऑफशोअर इंजिनिअरींग प्रा.लि. कंपनीच्या व्यवस्थापनामुळे येथील ग्रामस्थांना स्थानिक व व्यावयायिक समस्यांना   सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीनुसार काल दि.09 डिसेंबर   रोजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी स्थानिकांचे प्रश्न त्वरीत सोडविण्याचे निर्देश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत   दिले.              यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी भूमी अभिलेख विभागामार्फत तुरंबाडी गावचे सर्वेक्षण करुन 7/12 तयार करावेत, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डोमार्फत क्षेत्र दास कंपनी यांना प्रदान केलेल्या जमिनीबाबत ग्रामपंचायतीने सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करावी तसेच स्थानिक मच्छीमार बांधवांच्या मागणीनुसार पाहणी करुन सत्यासत्यता अहवाल सादर करावा, असे सांगून त्यांनी येथील स्थानिकांच्या मच्छिमारीवर गदा येत असल्याने येथील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा बैठक आयोजित करुन, कंपनीच्या वतीने जबाबदार अधिका

जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण व संख्या निश्चित --- जिल्हाधिकारी निधी चौधरी

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- ग्रामविकास विभाग, मंत्रालय,मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरपंच व उपसरपंचाची पदे वेगवेगळया प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे.               प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती-जमाती व प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे.             रायगड जिल्हयात ग्रामपंचायतींच्या एकूण 809   पदातील अनुसूचित जातीसाठी 33 ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असून, त्यातील खुल्या प्रवर्गासाठी 16 तर   17   पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत.       अनुसूचित जमातीसाठी 124 पैकी खुल्या प्रवर्गासाठी 62 व   महिलांसाठी 62 पदे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण 218 पदांपैकी 109 पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे आरक्षित असणार आहेत, सर्वसाधारण जागांसाठी एकूण 434 पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 217 तर   महिलांसाठी 217   पदे राखीव असणार आहेत, असे जिल्हाधिकारी निधी

अलिबाग येथे नवस्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मितीबाबत मंत्रालयात बैठक संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका) :   राज्य शासनाच्या मान्यतेनुसार अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करुन या महाविद्यालयाच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने येत्या वर्षात म्हणजेच सन-2021 मध्ये वैद्यकीय शिक्षणसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्राप्त होण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक संपन्न झाली.              या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खासदार श्री. सुनील तटकरे, अपर मुख्य सचिव नियोजन देबाशीष चक्रबर्ती, प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये सौरभ विजय, जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) व संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन श्री. तात्याराव लहाने उपस्थित होते.              यावेळी पालकमंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे उसर येथील सुमारे 42 एकर शासकीय जमीन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाची जमीन प्रदान करण्यात आली आहे. तसेच

नियोजित राज्य संग्रहालयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका): महाराष्ट्र राज्याचा अश्मयुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा सांस्कृतिक, ऐतिहासीक व भौगोलिक असा वैभवशाली प्रवास दर्शविणारे राज्य संग्रहालय हे मुंबई महानगर क्षेत्राजवळ रायगड जिल्ह्यात होण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली.              यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अपर मुख्य सचिव नियोजन देबाशीष चक्रबर्ती, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य सौरभ विजय, प्रधान सचिव वित्त श्री. देवरा, जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) व संचालक पुरातत्व विभाग श्री. गर्गे या बैठकीसाठी उपस्थित होते.              नियोजित राज्य वस्तूसंग्रहालयाचे महत्त्व, माहिती व संकल्पना मांडणारे सादरीकरण यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार व उपस्थितांसमोर करण्यात आले. तसेच या वस्तूसंग्रहालयाची संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करणे, विचार मंथन करणे, सुयोग्य जागेची निवड, प्रशासकीय तसेच वित्तीय बाबींबाबत धोरणात्मक निर्णय घेण

उरण येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु

  अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे 100 खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालय तसेच डॉक्टर,कर्मचारी यांच्यासाठी निवासी इमारत बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान श्री. पवार यांनी सकारात्मक मत मांडले.   या रुग्णालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक प्राथमिक निधी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.              या बैठकीसाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, खासदार श्री. सुनील तटकरे, आमदार मनोहर भोईर, अपर मुख्य सचिव नियोजन   देबाशिष चक्रबर्ती, प्रधान सचिव वित्त श्री. देवरा, सिडकोचे महाव्यवस्थापक संजय मुखर्जी, आरोग्य सेवा अभियान संचालक श्रीमती अस्मिता तायडे, जिल्हाधिकारी रायगड श्रीमती निधी चौधरी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप सचिव व प्रशांत पाटील उपस्थित होते.              उरण हा देशातील सर्वांत जास्त शासकीय व खाजगी प्रकल्प स्थापित झालेला तालुका आहे. या भागातील स्थानिकांनी वेळो

हयातीचा दाखला सादर करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

                 अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका) :   राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे शासनाकडून परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.             राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि. 01 नोव्हेंबर पासून ते दि. 30 नोव्हेंबर पर्यंत निवृत्तीवेतन आहरण व संवितरण प्राधिकाऱ्यास सादर करावा लागतो. हा हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या बँकेमार्फत संबंधित कोषागारात सादर केला जातो.               या वर्षात कोविड-19 मुळे हयातीचा दाखला सादर करण्यासाठी प्रथम दि.31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.   कोविड-19 चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाच्या धर्तीवर वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2020/प्र.क्र.90/कोषा प्रशा-5 दि. 8 डिसेंबर 2020 नुसार आता ही   मुदत दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.                तरी सर्व निवृत्तीवेतनधा

राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :-   राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मा.मंत्री महोदय श्री. नवाब मलिक साहेब यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, कोणत्याही विषयातील पद्वी तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीबाबत मंत्रालयात बैठक संपन्न काम लवकर सुरु करण्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे संबंधितांना निर्देश

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- माणगाव तालुक्यातील जावळी येथे प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीसाठी राज्यमंत्री तथा   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली.              रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने मौजे जावळी, ता. माणगांव येथील गट क्र. 73 क्षेत्री 9.12.00 हे.आर. मधील 2.00.00 हे.आर. जागा उप प्रादेशिक परिवहन कर्यालय, पेण यांनी ब्रेक टेस्ट ट्रॅक व इमारतीसाठी महसूल मुक्त सारामाफीने हस्तांतरण करण्यास मंजूरी दिलेली आहे. या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांचेकडून 250 X 6 मीटर्स आकाराचा ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणे, भूखंड विकसित करणे, आवार भिंतीचे बांधकाम, बांधीव गटार बाधंकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅक व्यतिरिक्त उर्वरीत जागेत पेव्हरब्लॉक पार्किंग बांधकाम, ब्रेक टेस्ट ट्रॅकवर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था, विद्युतीकरण व अनुषंगिक बाबींवर या बैठकीदरम्यान चर्चा झाली.              यावेळी पालकमंत्री कु. तटकरे यांनी ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी आवश्यक सुविधांसह अंदाजपत्रक त्वरित तयार करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना

संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अभिवादन

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.8 (जिमाका) :- संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.        यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000000

सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण करुन उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्वजनिधी संकलन करावे ---जिल्हाधिकारी निधी चौधरी

  सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण करुन उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्वजनिधी संकलन करावे            ---जिल्हाधिकारी निधी चौधरी     अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका) :- सीमेवर लढणाऱ्या ज्या जवानांमुळे आपण येथे सुरक्षित आहोत, त्या जवानांचे स्मरण करुन सर्वांनी उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्व्जदिन निधी संकलन करावे, असे आवाहन   जिल्हाधिकारी निधी चौधरी   यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व   सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ व विजय दिवस कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते   दीपप्रज्वलनाने   करण्यात आली. यावेळी   अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासणे,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सौ. कल्पना काकडे, माध्यमिक विभागाचे संजय पाटील, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वैभव विचारे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे प्रवीण पाटील, माजी सैनिक,शिक्षक, माजी सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी श्री.नाठाळकर, श्री.पाटील, श्री.कुंभार,श्री.शाम जोगळेकर, शुभांगी जोगळेकर, प्रशांत झाडेकर, शंकर काटे, मयांक देसाई, प्रकाश करंबत,

सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण करुन उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्वजनिधी संकलन करावे ---जिल्हाधिकारी निधी चौधरी

  सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण करुन उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्वजनिधी संकलन करावे            ---जिल्हाधिकारी निधी चौधरी     अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका) :- सीमेवर लढणाऱ्या ज्या जवानांमुळे आपण येथे सुरक्षित आहोत, त्या जवानांचे स्मरण करुन सर्वांनी उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त ध्व्जदिन निधी संकलन करावे, असे आवाहन   जिल्हाधिकारी निधी चौधरी   यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व   सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ व विजय दिवस कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते   दीपप्रज्वलनाने   करण्यात आली. यावेळी   अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासणे,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सौ. कल्पना काकडे, माध्यमिक विभागाचे संजय पाटील, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वैभव विचारे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे प्रवीण पाटील, माजी सैनिक,शिक्षक, माजी सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी श्री.नाठाळकर, श्री.पाटील, श्री.कुंभार,श्री.शाम जोगळेकर, शुभांगी जोगळेकर, प्रशांत झाडेकर, शंकर काटे, मयांक देसाई, प्रकाश करंबत,