मे.दास ऑफशोअर इंजिनिअरींग कंपनी प्रशासनाविरोधात स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश

 


 

            अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- म्हसळा तालुक्यातील मौजे तुरंबाडी येथे स्थापित मे.दास ऑफशोअर इंजिनिअरींग प्रा.लि. कंपनीच्या व्यवस्थापनामुळे येथील ग्रामस्थांना स्थानिक व व्यावयायिक समस्यांना  सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीनुसार काल दि.09 डिसेंबर  रोजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी स्थानिकांचे प्रश्न त्वरीत सोडविण्याचे निर्देश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत  दिले.

            यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी भूमी अभिलेख विभागामार्फत तुरंबाडी गावचे सर्वेक्षण करुन 7/12 तयार करावेत, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डोमार्फत क्षेत्र दास कंपनी यांना प्रदान केलेल्या जमिनीबाबत ग्रामपंचायतीने सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करावी तसेच स्थानिक मच्छीमार बांधवांच्या मागणीनुसार पाहणी करुन सत्यासत्यता अहवाल सादर करावा, असे सांगून त्यांनी येथील स्थानिकांच्या मच्छिमारीवर गदा येत असल्याने येथील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा बैठक आयोजित करुन, कंपनीच्या वतीने जबाबदार अधिकाऱ्यांनी व स्थानिक प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करुन वस्तुनिष्ठ अहवालासह उपस्थित राहण्याच्या संबंधितांना निर्देश दिले.        

या बैठकीसाठी गृह विभागाचे कक्ष अधिकारी संजय महाडेश्वर, प्र. तहसिलदार, म्हसळा के.टी भिंगारे, सी.ए.एफ.टी. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे संजय शर्मा, प्रशासकीय अधिकारी प्रदिप बडीये, मे.दास कंपनी प्रतिनिधी रणजित गांवकर व बाळा खंडाळकर, तुरुंबाडी ग्रामस्थ भारत गिते, अ.समद नजीर, अनंत पाटील व इतर उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज