नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया
दिनांक :- 26/11/2016 वृत्त क्र . 755 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयतेने मतदान करावे - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया अलिबाग दि .२६ - (जि.मा.का) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील पात्र मतदारांनी मनात संभ्रम शंका न ठेवता निर्भयतेने मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज खोपोली येथे केले. दि.२७ नोहेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यास ते दौऱ्यावर आले होते. यावेळी खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत दत्ता भडकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद दीपक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजु पाटोदकर आधी उपस्थित होते. ...