जिल्ह्यातील तापसदृश्य आजारी व्यक्तींच्या तपासणीसाठी विशेष 52 प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित
अलिबाग,दि.11 (जिमाका)- करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासन आणि प्रशासन दिवस-रात्र कार्यरत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता जिल्ह्यात तापसदृश्य आजारी व्यक्तींच्या तपासणीसाठी विशेष 52 प्राथमिक आरोग्य केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत. करोना आजारात जसा ताप येतो तसाच इन्फ्लुएंझा एच1एन1, सारी अशा प्रकारच्या इतरही काही आजारांमध्ये रुग्णाला ताप येतो. विविध तापसदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तात्काळ वैद्यकीय तपासणी व्हावी व निदान व्हावे याकरिता ही प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून तापसदृश्य आजार असलेल्या व्यक्तींची विनामूल्य तपासणी करण्यात येऊन त्याचे त्वरित निदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अशा विशेष प्राथमिक आरोग्य केंद्रांची ठिकाणे पुढीलप्रमाणे--- पोयनाड, पेढांबे, ढोकवाडे, चिखली, रे...