दि.01 मार्च ते 03 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर
कोविड-19- करोना विषाणू ” काळजी करू नका..काळजी घ्या ! अलिबाग,दि.04 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 03 एप्रिल 2020 दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve नागरीकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिाकंची संख्या - 1 हजार 646. निरीक्षणाखाली असलेल्या परंतू 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 185, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-269, उपचारानंतर बरे झाल्यामुळे भाभा हॉस्पिटल (Isolation) मधून घरी पाठविण्यात आलेले व घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) समाविष्ट केलेल्या नागरिकांची संख्या -1, या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-178. मुंबई कस्तुरबा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेले नागरिक-05 दाखल रुग्णांच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. सेव्हन हिल हॉस्पिटल, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नाग...