दि.01 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर
कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी
घ्या !
अलिबाग,दि.04 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 02 एप्रिल 2020 दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात
परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो
पुढीलप्रमाणे-
एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’
ve नागरीकांच्या संपर्कात आल्याने
निरीक्षणाखाली असलेल्या नागरिाकंची संख्या - 1 हजार 620. निरीक्षणाखाली असलेल्या
परंतू 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 137, घरामध्ये
अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-290, उपचारानंतर बरे झाल्यामुळे भाभा
हॉस्पिटल (Isolation) मधून घरी पाठविण्यात आलेले व घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine)
समाविष्ट केलेल्या नागरिकांची संख्या -1, या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम
आहे. शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-179.
मुंबई कस्तुरबा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेले नागरिक-05 दाखल
रुग्णांच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे.
सेव्हन हिल हॉस्पिटल, मुंबई येथे विलगीकरण
कक्षात दाखल नागरीक-01 असून या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. मुंबई
फोर्टीज हॉस्पिटल मुलूंड येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-02 असून या नागरिकाच्या
तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. MGM रुग्णालय पनवेल येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले
नागरीक-06 असून या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे.
परदेशी प्रवास करुन परतलेल्या
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय,
मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-257, कस्तुरबा गांधी
रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात
आलेल्या नागरिकांची संख्या-36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-221,
तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-189, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या
नागरिकांची संख्या-17, तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-15, ‘+’
ve रिपोर्ट असेलेले उपचारानंतर ‘-’ve रिपोर्ट आलेले नागरीक-01 अशी माहिती जिल्हा
प्रशासनाने कळविली आहे.
0000
Comments
Post a Comment