मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम नवमतदार व नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी --प्र.मा.जिल्हाधिकारी दिलीप हळदे
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा नवमतदार व वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दि.1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.मा.जिल्हाधिकारी दिलीप हळदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली . मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार तसेच पत्रकार उपस्थित होते. ...