खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा बैठक संपन्न

लोकाभिमुख योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दिल्या सूचना अलिबाग, दि.18 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयी संबंधित विभागांच्या विभाग स्तर / जिल्हास्तरावरील अधिकारी तर काही राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांविषयीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लोकाभिमुख, लोकोपयोगी विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, क...