अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज क्रीडा मार्गदर्शक सुमा सिद्धार्थ शिरूर यांचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या वतीने सत्कार संपन्न


अलिबाग, दि.17 (जिमाका):- जिल्ह्यातील अर्जून पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध नेमबाज क्रीडा मार्गदर्शक सुमा सिद्धार्थ शिरूर यांना केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी रायगड तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पनवेल येथील लक्ष शूटिंग क्लब येथे पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले.

याप्रसंगी माणगाव तालुका क्रीडा अधिकारी श्री.राजेंद्र अतनूर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती मनिषा मानकर, पनवेल महानगरपालिका क्रीडा समन्वयक श्री.समीर रेवाळे आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान