राष्ट्रीय लोक अदालत रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालत रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली अलिबाग दि.14(जिमाका) :- राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 11 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 324 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश,रायगड तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग, के.आर.पेटकर, जिल्हा न्यायाधीश-1, एल.डी.हुली, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अलिबाग, तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि अन्य न्यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, ॲड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रविण ठाकूर, सचिव ॲड. अे.डी.पाटील, मेट्रो सेंटर पनवेलचे भूसंपादन अधिकारी तसेच वकील वर्ग व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. ...