राष्ट्रीय लोक अदालत रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालत
रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली



            अलिबाग दि.14(जिमाका) :-  राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 11 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 324 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
            यावेळी मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश,रायगड  तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग,  के.आर.पेटकर, जिल्हा न्यायाधीश-1,  एल.डी.हुली, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अलिबाग, तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि अन्य न्‍यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, ॲड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रविण ठाकूर, सचिव ॲड. अे.डी.पाटील, मेट्रो सेंटर पनवेलचे भूसंपादन अधिकारी तसेच वकील वर्ग व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
            सदर लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्हयातून न्यायालयातील 2079 इतकी प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 324 प्रकरणे  निकाली निघाली. त्यामध्ये रुपये 5,03,25,071/- इतकी रक्कम नुकसान भरपाई  मान्य करण्यात आली. तसेच बँकांची वादपूर्व प्रकरणे 4375 ठवेण्यात आली होती. त्यापैकी 173 प्रकरणे निकाली निघाली. तर रुपये 31,07,792/- रक्कम वसुल करण्यात आली.
            सदर लोक अदालतीचे कामकाज सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरु होते. कामकाज सुरु असतांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्रत्येक कक्षावर भेट देवून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली होण्याच्या दृष्टीने प्रयत्न  करत होते.

                                                                                00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक