जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सोयी-सुविधांची, सुरू असलेल्या कामांची पाहणी
अलिबाग,जि.रायगड, दि.09 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतीच जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन तेथे नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसुविधांची, सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्याचबरोबर येथील नवीन इमारतीची बांधकाम पाहणी करताना त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वयाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रगतीपथावर असलेली कामे उत्तम दर्जाची तसेच नेमून दिलेल्या वेळेतच पूर्ण करावीत, असे निर्देश दिले. तसेच त्यांनी नागरिकांना मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार हात स्वच्छ धुवा, घराबाहेर अत्यावश्यक कारणांशिवाय पडू नये, कोणत्याही प्रका...