राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वाहिली आदरांजली

अलिबाग,जि.रायगड,दि.2, (जिमाका)- राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के- पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, तहसिलदार सतिष कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.