राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन

 

वृत्त क्रमांक :-1243                                                                             दिनांक :- 30 सप्टेंबर, 2020

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :- दि.1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त  जिल्हा शासकीय रक्त केंद्र , जिल्हा रुग्णालय, रायगड-अलिबाग येथे सकाळी 10.00  ते सायं. 5.00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या स्वैच्छिक रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दिपक गोसावी, रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत