सधन कुक्कुट विकास गटातून कुक्कूटपालनाला चालना
रायगड जिल्ह्यातील एकूण 15 सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी सन 2018-19 पासून टप्या टप्याने स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजने अंतर्गत खालीलप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 1) जमीन- 2500 चौ.फुट (1000 चौ.फुटाचे 2 शेड) खाद्य, अंडीसाठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र्य खोल्या. जमीन व खोल्या लार्भीच्या स्वत:च्या मालकीच्या असतील. 2) प्रति 1000 चौ.फुटाच्या 2 पक्षीगृहाचे बांधकाम,स्टोअर रुम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण सहभाग शासन व लाभार्थी एकूण अंदाजित किंमत चार लाख रुपये. 3) खाद्य व पाण्याची भांडी, ब्रडर, इतर उपकरणे व लसीकरण, सहभाग शासन व लाभार्थी एकूण अंदाजित किंमत पन्नास हजार रुपये. 4) अंडी ऊबवणूक यंत्र(mini setter cum hatcher) सहभाग शासन व लाभार्थी एकूण अंदाजित किंमत एक लाख 80 हजार रुपये. 5) 1000 एकदिवसीय मिश्र (नर + मादी) पिले प्रति पक्षी रु.60/- सहभाग शासन व लाभार्थी एकूण अंदाजित किंमत साठ हजार रुपये. 6) 20 आठवड्यांची अंड्यावरील 500 पक्षी (नर + मादी) प...