प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-  दैनंदिन व्यवहारामध्ये प्लास्टीक पिशवीचा (कॅरी बॅग) वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा. नागरीकांनी हि जागरुकता ठेवल्यामुळे प्लास्टिक कॅरी बॅग मुळे निर्माण होणाऱ्या  प्रदूषणास आळा बसेल,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
  रायगड जिल्हा महिला बचत गट सक्षमीकरण फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या कापडी पिशवीच्या स्टॉलचे उद्घघाटन प्रसंगी   ते बोलत होते.
ते म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्लास्टीक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा.   एकदा निर्माण झालेले प्लास्टीक हे कधीच नष्ट होत नाही.  ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात जाऊन ते जलचर व अन्य प्राण्यांच्या खाण्यात येतात. त्यामुळे प्राण्यांना त्रास होतो.     प्लास्टीक कचरा ही आज सार्वत्रिक समस्या आहे.  हा कचरा  आपल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये अडकून राहतो.  त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पावसाळ्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जिवित व  वित्तहानी होत असते.   व्यापक जनहिताच्या दृष्टीने  आणि प्लास्टीक बंदीचा प्रचार व प्रसार अधिकाधिक करावा, असे आवाहनही त्यांनी अधिकारी, कर्मचारी वर्गाला केले.
 यावेळी उपजिल्हाधिकारी (साप्र) डॉ.श्रीधर बोधे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000      


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज