Posts

Showing posts from February 2, 2025

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी

      रायगड,दि.5(जिमाका): सैनिक कल्याण विभाग  महाराष्ट्र राज्य  पुणे यांच्यातर्फे सर्व डाटा डिजीटलायझेशन/संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी, माजी सैनिकांनी   www.ksb.gov.in  व  https://mahasainik. maharashtra.gov.in   या    संकेतस्थळावर  नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग (निवृत) ले.कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.     रायगड जिल्ह्यातील सेवा निवृत अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा,वीर पत्नी,वीर माता/वीर पिता यांनी  www.ksb.gov.in  व  https://mahasainik. maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर दि.31 मार्च 2025 पूर्वी नोंदणी करावी. कार्यालयातील कोणत्याही अर्जावर कारवाई करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्हाला सध्या/आता कोणत्याही सेवेची आवश्यकता नसली तरीही दोन्ही संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट़ेशन करण्यासाठी ...

माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विधवा पत्नी यांची बचतगट क्लस्टर योजना

    रायगड,दि.5 (जिमाका) :  सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट़ राज्य, पुणे यांच्यातर्फे माजी सैनिक पत्नी/विधवा यांचा 11 च्या समूहाने बचत गट निर्माण करुन बँकेकडून कर्ज घेऊन स्वयंरोजगार सुरु केल्यास अशा  बचत गटांना  सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांचेकडून कल्याणकारी निधीमधून जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान /अर्थ सहायय देण्याची योजना सुरु आहे.  प्रकल्प व्यवस्थित सुरु असलेल्या बचतगटांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.             जिल्हयातील सर्व  माजी सैनिक पत्नी / विधवा पत्नी यांना बचत गट स्थापनेसाठी तसेच बचत गटांसाठी विविध स्वयंरोजगार योजनांची माहिती देणे प्रस्तावित आहे. जिल्हयामध्ये अगोदरच बचत गट स्थापन झालेले असल्यास तसेच नविन बचत गट स्थापन करणे करीता माजी सैनिक पत्नी / विधवा पत्नी इच्छूक असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. नावे नोंदणीसाठी आणि संपर्कासाठी-1.श्री  विष्णू काशिराम गायकवाड, कल्याण संघटक  मो. नं. 8...

अशासकीय वाहन चालक नियुक्तीकरिता इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

  रायगड,दि.5(जिमाका) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील बाह्ययंत्रणेद्वारे माजी सैनिक संवर्गातून बहुउद्देशीय स्वरूपाचे (Multitasking) अशासकीय वाहन चालक नियुक्ती करावयाची असल्याने जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2025  पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग (निवृत) ले.कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.   माजी सैनिक उमेदवाराचे शिक्षण इयत्ता दहावी पास अथवा सैन्यदलाकडून समकक्ष प्रमाणपत्र असावे. भारतीय सेनेमध्ये कमीतकमी 15 वर्षे सेवा झालेली असावी . याकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड, सैन्यसेवा पुस्तकाची छायांकित प्रत, माजी सैनिक ओळखपत्र,फोटो, बँक पासबुक छायांकित प्रत ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. 000000

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी

    रायगड,दि.5(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (HOME BASED CAREGIVER) या क्षेत्रात युवक युवतींना रोजगाराची संधी आहे याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.       इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (ऑन जॉब ट्रेनिंग सह). भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक...

11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार - राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर

      रायगड, दि.5 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) दि. 11  फेब्रुवारी ते 18 मार्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) दिनांक 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा दि. 11/02/2025 ते दि. 18/03/2025 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा दि. 21/02/2025ते दि. 17/03/2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली इ.12 वी व इ. 10 वीच्या परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त व निकोप वातावरणा...