माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विधवा पत्नी यांची बचतगट क्लस्टर योजना

 

 

रायगड,दि.5 (जिमाका) :  सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट़ राज्य, पुणे यांच्यातर्फे माजी सैनिक पत्नी/विधवा यांचा 11 च्या समूहाने बचत गट निर्माण करुन बँकेकडून कर्ज घेऊन स्वयंरोजगार सुरु केल्यास अशा  बचत गटांना  सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांचेकडून कल्याणकारी निधीमधून जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान /अर्थ सहायय देण्याची योजना सुरु आहे.  प्रकल्प व्यवस्थित सुरु असलेल्या बचतगटांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

            जिल्हयातील सर्व  माजी सैनिक पत्नी / विधवा पत्नी यांना बचत गट स्थापनेसाठी तसेच बचत गटांसाठी विविध स्वयंरोजगार योजनांची माहिती देणे प्रस्तावित आहे. जिल्हयामध्ये अगोदरच बचत गट स्थापन झालेले असल्यास तसेच नविन बचत गट स्थापन करणे करीता माजी सैनिक पत्नी / विधवा पत्नी इच्छूक असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. नावे नोंदणीसाठी आणि

संपर्कासाठी-1.श्री  विष्णू काशिराम गायकवाड, कल्याण संघटक  मो. नं. 8097127348, 2. श्री अभिजित दशरथ शिंदे, कल्याण संघटक  मो. नं. 7391988899,3. श्री विजय रमेश पाटिल, कल्याण संघटक,  मो. नं. 8985367005

तरी जिल्हयातील माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी महिला बचत गट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच  जिल्यामधील माजी सैनिक संघटना यांचेकडून ज्या महिला सदर योजनेसाठी पात्र आहेत व बचत गटाचे सदस्य झालेले नाहीत अशा माजी सैनिक पत्नींना बचत गट निर्माण करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज