भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने "छतावरील पाऊस पाणी संकलन व भूजल पुनर्भरण" आणि "पाणी गुणवत्ता" विषयावरील वेबिनार संपन्न
अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने यंत्रणेकडून जनसामान्यांपर्यंत भूजला बाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी व भूजल पुनर्भरण ही एक लोकचळवळ निर्माण होऊन, पाणी टंचाई वर मात करण्याच्या दृष्टीने भूजल साक्षरता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 5 व 6 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रायगड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने खास शेतकर्यां करिता वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांनी सांगितले की, पाणी हा खरतर सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. पण पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बरोबरच सिंचनासाठी आवश्यक असणा-या पाण्याच्या टंचाईवर सुध्दा मात करणे अत्यावश्यक आहे. यावेळी त्यांनी अनेक शेतक-यांना या वेबिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. नैसर्गिक तसेच...