राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास दि.4 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
रायगड,दि.22(जिमाका):- नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज सादर करण्यास दि.4 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी दिली आहे. देशातील AIIMS. IIM, IIIT, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातीलल विद्यार्थ्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली असून सन 2023-24 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या/नवबौद्ध घट्कांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समानसंधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. ...