राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेत रायगड जिल्ह्याला मिळाला द्वितीय क्रमांक


 

रायगड,दि.19(जिमाका) :-  रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी टीम रायगडमधून कु.अविष्कार रविंद्र कदम, इयत्ता  9 वी, चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे, अलिबाग  व  कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, के.ई.एस.ऍड नंदा देशमुख इंग्रजी माध्यमिक शाळा,अलिबाग या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याला  द्वितीय   क्रमांक मिळवून दिल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन विद्यार्थ्यांची एक टीम करून महाराष्ट्रातून एकूण 32 टीम ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या.  महाराष्ट्र राज्य ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम  क्रमांक, रायगड जिल्ह्याने  द्वितीय   क्रमांक तर गडचिरोली जिल्ह्याने  तृतीय   क्रमांक मिळवला आहे. 

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्यामार्फत  जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त (दि.13 डिसेंबर 2023) रोजी जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  यामध्ये   कु.स्नेहल सचिन जाधव  कु. अविष्कार रविंद्र कदम यांची  रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी टीम रायगड म्हणून निवड करण्यात आली होती.  

              रायगड जिल्हयातून महाराष्ट्र राज्य ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी टीम रायगड मध्ये कु. अविष्कार रविंद्र कदम, इयत्ता  9 वी, चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे अलिबाग  व  कु. स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, के.ई.एस.ऍड. नंदा देशमुख इंग्रजी माध्यमिक शाळा, अलिबाग  या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याला द्वितीय   क्रमांक मिळवून दिला असल्याने  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्याकडून विजेत्या दोन्ही  विद्यार्थ्यांना प्रत्येकी रक्कम रु. 4 हजार रोख पारितोषिक तसेच डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड -अलिबाग  यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.  

ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,  जिल्हा रुग्णालय, अलिबाग संजय माने   व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. 

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत