पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन
रायगड,दि.06(जिमाका):-उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत यांच्या अध्यक्षेतेखाली व जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.07 मार्च 2024 रोजी सकाळी 10:00 ते सायं. 6:00 या वेळेत विरुपक्ष मंगल कार्यालय, 121/बी, रत्नाकर खरे मार्ग, पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहच...