अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 1 ली व 2 री इयत्तेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 31 मार्च पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक
अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका) :- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते इयत्ता 2 री मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1 लाख इतकी असावी, इयत्ता 1 ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे पूर्ण असावे, वय 30 सप्टेंबर 2021 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म 1 ऑक्टोबर 2014 ते 30 सप्टेंबर 2015 दरम्यान झालेला असावा, इयत्ता 2 री च्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा इयत्ता 1 ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत सादर करावे, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्...